LokSabha2019 खासदार धोत्रेंना हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा!

शनिवार, 16 मार्च 2019

अकोला : खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा शनिवारी (ता.१६) दुपारी शहरात पसरली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांसह इतर राजकीय तथा नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. परंतु, धोत्रे नियमित चेकअपसाठी रुग्णालयात गेले असून, त्यांची प्रकृती ठणठणीत  असल्याचा खुलासा स्वतः धोत्रे यांनाच करावा लागला. सोशल मिडियावर पसरलेल्या अफवेमुळे मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांसह इतर राजकीय तथा नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.

धोत्रे यांना मानेचा व पाठीचा त्रास असल्यामुळे ते नेहमीच डॉक्टरकडे तपासणीसाठी जात असतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता. 15) सुध्दा ते डॉक्टरांकडे नियमित चेकअप करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. डावा हात आणि खांदा दुखत असल्याने डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या. तपासनी झाल्यानंतर डॉक्टरांनी खासदार धोत्रे यांना काही वेळ कोणतेही काम न करता आराम करण्याचा व थोडा उपचार घेण्याचा सल्ला दिला. 

सगळीकडे पसरलेल्या अफवेमुळे त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते एकमेकांना फोन करीत होते. त्यामुळे ही अफवा आणखी जोरात पसरली. दुपारनंतर खासदारांचा आपण अगदी ठणठणीत असल्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत त्यांनी आपली प्रकृती चांगली असून आपण नियमित चेकअपसाठी रुग्णालयात आलो होतो. कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी काळजी करण्याचे कारण नाही असे सांगून  कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. 

Web Title:

MP Dhotre rumors of heart attack