गोव्यात मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसने केला सत्ता स्थापनेचा दावा

गोव्यात मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसने केला सत्ता स्थापनेचा दावा

पणजी, 16 मार्च: दिल्लीत भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. लोकसभेसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी भाजपची दिल्लीत बैठक सुरु असताना दुसऱ्या बाजूला गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहले आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने असा दावा केला आहे की भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. राज्यात सर्वाधिक आमदार काँग्रेस सोबत असल्याचे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी दिली पाहिजे. राज्यात राष्ट्रपतीशासन आणता येणार नाही. तर तसे प्रयत्न झाले तर त्याला आव्हान दिले जाऊ शकते असे देखील काँग्रेसचे म्हणणे आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 17 जागांवर तर भाजपने 13 जागांवर विजय मिळवला होता. पण अन्य पक्षांना सोबत घेऊन भाजपने सत्ता मिळवली होती.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे राज्याचा कारभार कुणाच्या तरी हाती द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण पर्रीकर जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत गोव्यात कोणतंच राजकीय संकट येणार नाही, असा दावा गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी केला होता.

भाजपचे गोवा सरकारमधले उमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांचं निधन झाल्यानंतर ती भाजपची एक जागा कमी झाली. मनोहर पर्रीकर प्रत्यक्ष कामकाज पाहत नाहीत. त्यांच्याकडे 20 पेक्षा अधिक खाती आहेत. त्याचं वाटप झालेलं नाही. त्यामुळे गोव्यात प्रशासन राहिलेलं नाही, असही काँग्रेसचे म्हणणे आहे.


Loading…

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. याबाबत आता गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या फेटाळून लावत मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री पर्रिकर यांना अन्नाशयाचा कर्करोग झाला आहे. 63 वर्षीय पर्रिकर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गोव्यातील निवासस्थानी पर्रिकरांवर उपचार सुरू आहेत. नियमित तपासणीसाठी मुख्यमंत्री पर्रिकर यांना गोव्याच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. याआधी 3 मार्चला त्यांची नियमित तपासणी झाली होती. तर फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती.

पर्रिकरांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे राज्याचा कारभार दुसऱ्या कोणाच्या तरी हाती द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. त्यांचा आजार पाहता त्यांना कर्तव्यातून मुक्त करण्यात यावे असं विरोधकांनी म्हटलं होतं. दरम्यान, गोव्याचे वीजमंत्री निलेश कॅबरल यांनी पुढच्या निवडणुकांमध्ये गोवा भाजपला पर्रिकर मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले होते.

सत्ताधारी पक्षाने वारंवार मुख्यमंत्री पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवांचे खंडण केले आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. गेल्या काही दिवसांत पर्रिकर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पर्रिकरांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून ते दिल्लीच्या एम्स, न्यूयॉर्क, मुंबई आणि गोव्याच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.दरम्यान, एम्समध्ये भरती होण्यापूर्वी पर्रिकर यांनी गोवा विधानसभेच्या सत्रात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 2019-20चा अर्थसंकल्प सादर केला होता.मध्यंतरी, गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी सांगितलं की, ‘पर्रिकरांना जो आजार आहे, त्यावर कोणता उपचार नाही आहे. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत कोणतंच राजकीय संकट येणार नाही.’

VIDEO : अजित पवारांची सुजय विखेंवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या

फेसबुक पेजला
,

टि्वटरवर
आणि
जी प्लस
फाॅलो करा

Tags:

First Published: Mar 16, 2019 06:29 PM IST