अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 13 फेब्रुवारी : महाआघाडीमध्ये मनसेच्या सहभागावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकारात्मक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दादर इथं मनसेच्या कार्यकर्त्याच्या घरी राज ठाकरे यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दोनच दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी ‘मताचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आमच्यासोबत यावं’ असं विधान अजित पवारांनी केले होतं. राज ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन केल्यानं राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राज ठाकरे हे आमच्यासोबत आता जरी दिसत असले तरी आगामी काळात आमच्यासोबत येतील असं दिसतं नाही’ असं सांगितलं होतं.

आता खुद्द अजित पवारांची राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दादरमध्ये एका कार्यकर्त्याच्या घरीही भेट झाली आहे.


Loading…

दरम्यान, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनीही जाहीरपणे राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. ‘शिवसेनापेक्षा मनसे चांगली आहे. अजित पवार काय म्हटले हे मला माहिती नाही, पण शिवसेना संधीसाधूपणा करणारी आहे. निवडणूक आधी मोदी याचं कौतुक करायचं आणि नंतर मात्र मोदींना नाव ठेवायचे काम सेना करते, अशी टीका देवरा यांनी केली.

तसंच ‘राज ठाकरे यांच्याबाबत माझे मत हे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत. एकवेळेस मनसे चांगली आहे पण शिवसेना नाही’ असंही ते म्हणाले.

‘शिवसेना आपल्या स्वार्थासाठी मोदींचा फायदा घेतला आणि सत्तेत बसली. आता मोदींची लोकप्रियता कमी झाली म्हणून मोदींवरच सेना टीका करत आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.

==============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या

फेसबुक पेजला
,

टि्वटरवर
आणि
जी प्लस
फाॅलो करा

Tags:
ajit pawarmilind devraNCPRaj ThackerayRaj Thackeray NewsRaj Thackery

First Published: Feb 13, 2019 07:18 PM IST