अंबरनाथमध्ये रामदास आठवलेंवर तरुणाचा हल्ला

अंबरनाथमध्ये रामदास आठवलेंवर तरुणाचा हल्ला

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

अंबरनाथ,08 डिसेंबर : रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमध्ये हल्ला करण्यात आला. व्यासपीठावरुन उतरत असताना एका तरुणाने रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. रिपाइंच्या कार्यकर्त्यानी या तरुणाला पाहताच पकडले आणि बेदम चोप दिला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अंबरनाथ पश्चिममध्ये विको नाका परिसरात नेताजी मैदानात संविधान दिनानिमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रामदास आठवले आले होते. यावेळी आठवले यांनी जवळपास अर्धा तास भाषण केलं. भाषण आटोपल्यानंतर रामदास आठवले स्टेजवरून खाली उतरत होते. त्यावेळी प्रवीण गोसावी नावाचा तरुण त्यांच्याजवळ गेला. या तरुणानं आठवले यांच्याशी हुज्जत घातली. काही कळण्याच्या आता या प्रवीणने अचानक रामदास आठवले यांच्यावर हल्ला केला.त्यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या आठवले यांच्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं.


Loading…

हा प्रकार घडल्यानंतर तिथे उपस्थिती असलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडलं आणि बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. या तरुणाने रामदास आठवले यांच्यावर का हल्ला केला याची चौकशी पोलीस करत आहे.

हल्ला करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप

अंबरनाथमध्ये काही गट आहे. ते गट पहिल्यापासून अतिरेक करत असतात. त्यांच्यातला एक कार्यकर्ता हा स्टेजजवळ पोहोचला आणि हुज्जत घालत होता. आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ६ डिसेंबरलाही सभा घेण्यावरुन वाद झाला होता अशी माहिती रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांनी दिली.

अंबरनाथमध्ये संघटनेचा तो कार्यकर्ता आहे. रामदास आठवले यांनी कोणतीही भूमिका घेतली त्या प्रत्येक भूमिकेला या गटाचा विरोध असतो असंही महातेकर यांनी सांगितलं.

======================

रामदास आठवलेंवर हल्ला करणाऱ्या तरुणाची ओळख पटली!

============================

image

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या

फेसबुक पेजला
,

टि्वटरवर
आणि
जी प्लस
फाॅलो करा

Tags:

First Published: Dec 8, 2018 10:29 PM IST